Memory loss
भुतकाळातल्या कटु व नको
असलेल्या आठवणी कधीकधी मन विदिर्ण करुन टाकतात.
आपण उगाचच विचार करत रहतो कि 'त्या वेळी असं का बर झालं असेल', 'कोणीतरी व्यक्ति वा आपण का तसं वागलो असेल'.
वास्तविक पाहता सदर गोष्टी भूतकाळात घडून गेलेल्या असतात पण तरीही आपण त्या परत आणून त्यात बदल करु इच्छीतो, जे कि कधीच शक्य नाही. थोडक्यात धनुष्यातून एकदा सुटलेला बाण जसा परत येत नाही तसच घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा बदलता येत नाहीत.
वास्तविक पाहता सदर गोष्टी भूतकाळात घडून गेलेल्या असतात पण तरीही आपण त्या परत आणून त्यात बदल करु इच्छीतो, जे कि कधीच शक्य नाही. थोडक्यात धनुष्यातून एकदा सुटलेला बाण जसा परत येत नाही तसच घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा बदलता येत नाहीत.
असाच एकदा भुतकाळात
घडलेल्या वाईट गोष्टींच्या विवंचनेत असताना एकदा एक मराठी चित्रपट(मी बहुदा मराठी
चित्रपटच पाहतो) माझ्या पाहण्यात आला.चित्रपटाचं “गोजिरी” असं काहीसं नाव होते. आता
चित्रपटाचे दिग्दर्शक वगैरे माझ्या स्मरणात नाहीत पण चित्रपट लक्षात राहण्याचं
कारण त्याचं कथानक होते.
चित्रपटाचे कथानक फ़ारच
वेगळं होतं. कथानकाची नायिका “गोजिरी” नावाची मुलगी होती. एका अपघाताने तिला स्मृतीभ्रंशाचा कसलासा एक विचित्र आजार होतो. अपघात ज्या दिवशी झालेला असतो गम्मत म्हणजे गोजिरीचे आयुष्य त्याच दिवसावर येउन थांबलेल दाखवलेलं आहे.अपघात व अपघातानंतर गोजीरीच्या स्मरणात काहीही राहत नाही. ज्या दिवशी तिच्या बहिणीचा वाढदिवस असतो त्याच दिवशी तिच्या बहिणीचा वाढदिवस असतो, आता गोजिरी रोज झोपेतुन उठते
ते आज तिच्या बहिणीचा वाढदिवस कसा साजरा करायचा या विचारनेच ,ती रोज उठून आपल्या
बहीणीच्या वाढदिवसाची तयारी करते. गोजिरीचे वडील तिला तिच्या आजारपणा बद्दल समजू
नये यासाठी खुप खबरदारी घेत असतात. अगदी त्या सालचे कॅंलेडर सुद्धा ते घरातून हालवत नाहीत. त्याच सालातील त्याच
दिवशी चा तोच महिना त्या वर उघडलेला असतो. रोज तिच्या सोबत ते तिच्या बहिणीचा
वाढदिवस साजरा करत असतात. पण सदर दिवशी ती काय करते, कोणाकोणाला भेटते, हे ती
दुसऱ्या दिवशी साफ़ विसरलेली असते. परत दुसऱ्या दिवशी तोच दिनक्रम अन बहिणीच्या वाढदिवसाचा
तोच उत्साह.
कथानकात जेंव्हा नायकाचा प्रवेश
होतो तेंव्हा त्याला वेगळं वळण मिळते. नायक नायिकेच्या गावी त्याच्या वडीलार्जीत मालमत्तेच्या
कामासाठी आलेला असतो. त्याची अन नायिकेची एके ठिकाणी भेट होते अन ओळखही. दुसऱ्या दिवशी नायक पुन्हा भेटल्यावर तिच्याशी बोलायला जातो पण नायिका त्याला ओळखत नाही. नायक
तिला कालच्या भेटीबद्दल आठवण करुन देण्याचा प्रयत्न करतो पण तिला नायक मुद्दामहून
ओळख काढत आहे असं वाटून ती नायकाचा पाणऊतारा(अपमान)करते. नायिका निघुन गेल्यावर गावातील
लोक नायकाला नायिकेच्या आजारपणाबद्दल सांगतात. आता नायकाला तिच्याबद्दल वाइट
वाटते.
कुतुहलापोटी नायक नयिकेला
रोज भेटतो अन तिच्याशी रोज ओळख करुन घेतो अन आपण गावात नवीन असल्याच सांगून गाव
फ़िरवण्याची विनंती करतो त्याचबरोबर दिवशभराच्या घटनांचा व्हिडिओ तो रेकॉर्ड करत
असतो. नायकाचा हा रोजचा दिनक्रम बनतो. काही दिवसानी नायक नायिकेच्या प्रेमात पडतो
अन तिच्या वडीलांकडे नायिकेला मागणी घालतो. नायिकेचे वडील तिच्या आजारपणाची कल्पना
देउन लग्नास नकार देतात. अखेर नायक तिला आयुष्यभर सुखि ठेवण्याच वचन देउन तिच्याशी
लग्न करतो.
पुढे लग्नानंतर नायिका रोज
सकाळी झोपेतुन उठल्यावर आपल्या शेजारी नायकाला झोपलेले पाहुन दचकते व आरडाओरड करते
नायकाला याचि कल्पना असते ,तो तिला शांत करुन समोर टी व्ही चालु करुन
त्यामधे घडून गेलेल्या घटनांचे त्याने वेळोवेळी केलेले व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवतो.याचबरोबर
तिच्या आजारपणा विषयी तिला कल्पना देउन तो तिचा नवरा असल्याची जाणीव करून देतो.
गम्मत म्हंनजे नायकाची सकाळ आयुष्यभर अशीच सुरु राहते.
कथानक ऐकुन वा चित्रपट बघुन
मी असा आजार झालेल्या व्यक्तिला सहानुभुती द्यावी कि त्याचे अभिनंदन करावे हा मोठा
गहन प्रश्न निर्माण होतो.
आयुष्य माणसाला खुप वाईट
आठवणी देत राहते त्या विसरता विसरत नाहीत. माणसाची एवढी मोठी प्रगती झाली तरी वाईट
व कटू आठवणी पुसण्याच तंत्र वा यंत्र अजुन विकसित झालेलं नाही.
कथानकातील नायिकेचा दिवस
मात्र रोज नविन असतो, सकाळी चालु होतो अन रात्री संपतो दुसऱ्या दिवशी ना कुठली आठवण
राहते ना ओळख.
कधी कधी वाईट आठवणी घेरायला
आल्या की वाटतं आपल्याला पण चित्रपटातल्या नायिकेसारखा आजार का नाही होत....असो याबद्दल मी आपल्या नशिबाला दोष देउन पुढील वाटचाल करतो
वा एका महान माणसाचा उपदेश आठवतो.
“आठवणी दुधारी तलवारी सारख्या असतात त्या
आठवून आठवूनच बोथट कराव्या लागतात.”
झेंब्या तावडे-पाटील