Memory loss
भुतकाळातल्या कटु व नको
असलेल्या आठवणी कधीकधी मन विदिर्ण करुन टाकतात.
आपण उगाचच विचार करत रहतो कि 'त्या वेळी असं का बर झालं असेल', 'कोणीतरी व्यक्ति वा आपण का तसं वागलो असेल'.
वास्तविक पाहता घटना भूतकाळात घडून गेलेल्या असतात पण तरीही आपण त्या परत आणून त्यात बदल करु इच्छीतो, जे कि कधीच शक्य नाही. थोडक्यात धनुष्यातून एकदा सुटलेला बाण जसा परत येत नाही तसच घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा बदलता येत नाहीत.
वास्तविक पाहता घटना भूतकाळात घडून गेलेल्या असतात पण तरीही आपण त्या परत आणून त्यात बदल करु इच्छीतो, जे कि कधीच शक्य नाही. थोडक्यात धनुष्यातून एकदा सुटलेला बाण जसा परत येत नाही तसच घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा बदलता येत नाहीत.
असाच एकदा भुतकाळात
घडलेल्या वाईट गोष्टींच्या विवंचनेत असताना एकदा एक मराठी चित्रपट(मी बहुदा मराठी
चित्रपटच पाहतो) माझ्या पाहण्यात आला.चित्रपटाचं “गोजिरी” असं काहीसं नाव होते. आता
चित्रपटाचे दिग्दर्शक वगैरे माझ्या स्मरणात नाहीत पण चित्रपट लक्षात राहण्याचं
कारण त्याचं कथानक होते.
चित्रपटाचे कथानक फ़ारच
वेगळं होतं. कथानकाची नायिका “गोजिरी” नावाची मुलगी होती. एका अपघाताने तिला स्मृतीभ्रंशाचा कसलासा एक विचित्र आजार होतो. अपघात ज्या दिवशी झालेला असतो गम्मत म्हणजे गोजिरीचे आयुष्य त्याच दिवसावर येउन थांबलेल असते.अपघात व अपघातानंतरचे कोणतेही प्रसंग गोजीरीच्या स्मरणात राहत नाहीत. ज्या दिवशी तिच्या बहिणीचा वाढदिवस असतो त्याच दिवशी तिचा अपघात होतो.
आता गोजिरी रोज झोपेतुन उठते
ते आज तिच्या बहिणीचा वाढदिवस कसा साजरा करायचा या विचारनेच उठते.गोजिरी रोज उठून आपल्या
बहीणीच्या वाढदिवसाची तयारी करते. गोजिरीचे वडील तिला तिच्या आजारपणा बद्दल समजू
नये याची खुप खबरदारी घेत असतात. अगदी अपघाताच्या सालचे कॅंलेडर सुद्धा ते घरातून हालवत नाहीत. अपघात झालेल्या सालातील त्या दिवशीचा तोच महिना कॅलेंडरवर उघडलेला असतो. रोज तिच्या सोबत ते तिच्या बहिणीचा
वाढदिवस साजरा करत असतात. पण त्या दिवशी ती काय करते, कोणाला भेटते, हे ती
दुसऱ्या दिवशी साफ़ विसरलेली असते. परत दुसऱ्या दिवशी तोच दिनक्रम अन बहिणीच्या वाढदिवसाचा
तोच उत्साह.
कथानकात जेंव्हा नायकाचा प्रवेश
होतो तेंव्हा त्याला वेगळं वळण मिळते. नायक गोजिरीच्या गावी त्याच्या वडीलार्जीत मालमत्तेच्या
कामासाठी आलेला असतो.एके दिवशी त्याची अन गोजिरीची एके ठिकाणी भेट होते अन ओळखही. दुसऱ्या दिवशी नायक पुन्हा भेटल्यावर तिच्याशी बोलायला जातो पण गोजिरी त्याला ओळखत नाही. नायक
तिला कालच्या भेटीबद्दल आठवण करुन देण्याचा प्रयत्न करतो पण नायक मुद्दामहून
ओळख काढत आहे असं वाटून ती नायकाचा पाणऊतारा(अपमान)करते. गोजिरी निघुन गेल्यावर गावातील
लोक नायकाला गोजिरीच्या आजारपणाबद्दल सांगतात. आता नायकाला तिच्याबद्दल वाइट
वाटते. कुतुहलापोटी नायक गोजिरीला रोज भेटतो अन तिच्याशी रोज ओळख करुन घेतो. प्रत्येक वेळी आपण गावात नवीन असल्याच सांगून गाव
फ़िरवण्याची विनंती करतो. त्याचबरोबर भेटीतील दिवशभराच्या घटनांचा व्हिडिओ तो रेकॉर्ड करत
असतो. नायकाचा हा रोजचा दिनक्रम बनतो. रोज नव्याने भेटणाऱ्या गोजिरीच्या काही दिवसानी नायक प्रेमात पडतो
अन तिच्या वडीलांकडे गोजिरीला मागणी घालतो. गोजिरीचे वडील तिच्या आजारपणाची कल्पना
देउन लग्नास नकार देतात. पण नायक हार मानत नाही,अखेर नायक गोजिरीला आयुष्यभर सुखि ठेवण्याच वचन तिच्या वडिलांना देतो व गोजिरीशी लग्न करतो.
पुढे लग्नानंतर गोजिरी रोज
सकाळी झोपेतुन उठल्यावर आपल्या शेजारी नायकाला झोपलेले पाहुन दचकते व आरडाओरड करते. नायकाला याची कल्पना असते ,तो तिला शांत करुन समोर टी व्ही चालु करतो. तो रोज त्याने नायिकेच्या भेटीचे व घडून गेलेल्या घटनांचे त्याने वेळोवेळी केलेले व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवतो. याचबरोबर रोज तिला तिच्या आजारा ची कल्पना देउन तो तिचा नवरा असल्याची जाणीव करून देतो.
गम्मत म्हणजे नायकाची सकाळ आयुष्यभर अशीच सुरु राहते.
कथानक ऐकुन वा चित्रपट बघुन
मी असा आजार झालेल्या व्यक्तिला सहानुभुती द्यावी कि त्याचे अभिनंदन करावे हा मोठा
गहन प्रश्न निर्माण होतो.
आयुष्य माणसाला खुप वाईट
आठवणी देत राहते त्या विसरता विसरत नाहीत. माणसाची एवढी मोठी प्रगती झाली तरी वाईट
व कटू आठवणी पुसण्याच तंत्र वा यंत्र अजुन विकसित झालेलं नाही. कथानकातील नायिकेचा दिवस
मात्र रोज नविन असतो, सकाळी चालु होतो अन रात्री संपतो दुसऱ्या दिवशी ना कुठली आठवण
राहते ना ओळख.
कधी कधी वाईट आठवणी घेरायला
आल्या की वाटतं आपल्याला पण चित्रपटातल्या नायिकेसारखा आजार का नाही होत....असो याबद्दल मी आपल्या नशिबाला दोष देउन पुढील वाटचाल करतो
वा एका महान माणसाचा उपदेश आठवतो.
“आठवणी दुधारी तलवारी सारख्या असतात त्या
आठवून आठवूनच बोथट कराव्या लागतात.”
झेंब्या तावडे-पाटील